या पुढील पोस्ट पाहण्यासाठी येथे टिचकी मारा
माझा आजचा विचार (वर्ड प्रेस येथे)
नवीन पोस्ट साठी येथे टिचकी मारा: majhaaajchavichar.wordpress.com दिवस उजाडतो आणि मगोमाग रात्र येते. आज काय केले हा प्रश्न मागे उरतो. हातुन काही चांगले काम घडले की नु्सताच वेळ गेला… बाकी काहि नाही निदान काहि चांगला विचार तरी केला का? आणि मग ह्या “Blog” ची निर्मीती झाली.
| Browser | JS Speed | fps | Memory | Rank |
| Opera 10.63 | 220-260 | 50-70 | 55K-60K | 1 |
| Safari 5.0.2 | 200-240 | 30-70 | 110K-130K | 2 |
| Firefox 4.0b7 | 150-205 | 25-55 | 75K-90K | 3 |
| Chrome 7 | 80-180 | 20-40 | 200K-500K | 4 |
| SeaMonkey 2.0.10 | 10-20 | 5-7 | NA | DNF |
| Internet Explorer 8 | NA | NA | NA | DNF |
“सायेब, एक मराठी पिच्चर प्रोडूस करतुय त्याबाबद तुमच्याशी बोलता यील ना आत्ता?”
“मला कोणत्याही वेळी बोलता येतं. मी व्हॅक्यूम मध्ये सुद्धा बोलू शकतो”
“नायी, वाल्युम मोठाच आहे इकडं. पन रागावू नका जरा रातच्याला फोन केला. नाईट कालिंग हाफ रेट मध्ये पडतं ना. आमी प्रायोगिक निर्माते आहोत सायेब, पिच्चर करायचा म्हन्जे पैसे वाचवावे लागतात सर्वीकडे. तुमी मराठी पिच्चरमदी काम करायचं म्हनला म्हनून फोन केला”
“ते माहित्येय मला. काय स्टोरी आहे तुमची?”
“ष्टोरी तुमी म्हनाल ती”
“पण तुमच्या डोक्यात काहीतरी असेल ना?”
“गरीबाला कसली आलीय ष्टोरी न् बिरी सायेब. गावाकडची मान्सं, एक चांगला शेतकरी आन् त्याच्या चांगल्या बायकोचा हात धरनारा बाराचा सरपंच. घरात म्हातारी सासू आन् तमाशाला जानारा दीर आसलं कायतरी जुगाड असतं सायेब आमचं. तुमी आमच्या पिच्चरमदी काम करा तुमाला पायजे तो रोल करा, हवं तर समदे रोल तुमीच करा पन तुमची ती ष्टाईल आमच्या गावाकडं लई आवडते पब्लिकला तेवडं जमवा सायेब.”
“डिरेक्टर कोण आहे?”
“शंकर”
“शंकर? त्याच्यासोबत मी लेटेस्ट रोबो केला तो पण मराठी सिनेमा करतोय?”
“न्हाई तो तुमचा शंकर न्हायी सायेब, आमचा शंकर, शंकर विसपुते. ‘सडा निळ्या कुंकवाचा’ला असिश्टन होता तो सायेब, सातवा. पन तेवडं गागलवाल्या ष्टाईलचं जमवा.”
“बरं”
“आन् त्या गागलवाल्या ष्टाईलमदे सायेब तुमी गागल वर फेकून डोळ्यावर बशिवता तेवा वरून खाली पडताना तो मोडत आसंल ना कदीमदी?”
“हो मोडतो बरेचदा. त्याचा रिटेक घेतो मग आम्ही”
“आन् मग गागल तुमी आन्ता का आमाला द्यावा लागंल? न्हायी, रागवू नका सायेब पन आसले रेबानचे चार गागल तुमी मोडले तर बसला का चार चोक सोळा हजाराला बांबू आमाला?
“अरे पण प्रॉपर्टी तर तुम्हालाच द्यावी लागेल ना?”
“आमी फार तर तुमच्या बिडी फेकन्याच्या ष्टाईलसाठी शिवाजी बिडीचं एक बंडल देऊ. हवं तर माचिसचा आख्खा बॉक्स आनू नवा कोरा. पन काय सायेब आमालाबी परवडलं पायजेल ना? आनि काश्चूम तुमचा तुमाला आनावा लागेल.”
“कमाल झाली तुमची..”
“तसं नाय सायेब, पन अशोक शिंदेसाठी शिवलेली कापडं तुमाला नाई बसली तर कम्परटेबल वाटनार नाई तुमालाच. आपली कापडं आपल्याबरोबर आसलेली बरी, कसं म्हंता?”
“जेवायला तरी घालाल की घरून डबा आणावा लागेल?”
“काय सायेब गरीबाची थट्टा करता? जेवायला घालू की आमी. काय पांढरा म्हना, तांबडा म्हना, पेशल रस्सा करू रोज. झालंच तर मोर, ससे काय पायजेल ते देऊ की. जेवनात मागंपुडं बघत नाई आम्ही सायेब. शेवटी तुमी काय नि आमी काय, जे काय पैसे कमावतो ते दोन वेळच्या जेवनासाठीच ना? मग त्यात कसली कंजूशी करायची सायेब?”
“आणि पेमेंटचं काय?”
“पेमेंट कॅश करतो की रोजच्या रोज आमी”
“नशीब माझं. पण किती देणार?”
“मोट्या हिरोला जेऊनखाऊन बारा देतो आमी रोजचे, तुमाला साडेबारा देऊ सायेब”
“रोजचे साडेबारा लाख फक्त?”
“लाख नायी, हजार सायेब. साडेबारा लाखात तर आमचा पिच्चर कंप्लेट होतो सायेब”